५ जून, २०२०
फोडणी
दोन सुशब्द झाल्यावर आणखी 'प्रस्तावना' कशाला? म्हणून ही प्रस्तावना नसून 'फोडणी' आहे. फोडणी दिल्याशिवाय भाजी साधत नाही. ही फोडणी केवळ कथेची नाही त्यातल्या पात्रांचीही आहे पण वेगळ्या अर्थाने. कथा दोन पात्रांच्या आत्मवृत्तात फोडून विभागली आहे. कथेतील आत्मवृत्तांचे एकाड एक एकूण पाच भाग आहेत, 'दत्ता' आणि 'अरविंदा'. ही आत्मवृत्त या कथेपुरतीच मर्यादित आहेत. ती एकाच गांडुळाची दोन मुंडकी आहेत. कथा एकच आत्मवृत्त दोन. ती एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असली तरी एकाच वाटेनं चालत कथा एकसंध ठेवतात. यातल्या अरविंदाची बोलीभाषा गावंढळ आहे. आत्मवृत्त लिहिताना मौनिक भाषा (मनाची विचार करण्याची भाषा) महत्त्वाची. मौनिक भाषा हे बोलीभाषेचच बीज असत. आंतरिक गर्भात जेव्हा मौनिक भाषेचं बीज रुजत, तेव्हा कुठे बोलीभाषेची रोप उगवतात. यातली सगळीच बीज उगवतातच अस नाही. बरीच बीज तिथंच गुरफटून उगवणाऱ्या बीजांची खत बनतात. अरविंदाचं आत्मवृत्त त्याच्या मौनिक भाषाशैलीत लिहिणं थोड जड जाईल आणि पहीलाच प्रयत्न असल्या कारणाने माझी कथाही भरकटेल म्हणून ती समांतर ठेवून पुढे सरकत जाण्यासाठी बोलीभाषेला धक्का न लावता दोघांचीही आत्मवृत्त एकाच मौनिक भाषेत अविरत राखली आहेत. कथेचे भाग सुशब्द मध्ये add केले आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वास्तुपुरुष
भरलेल्या आभाळानं पहाटेचा उसासा रोखून धरला होता. कोपऱ्यांना गुडघ्याशी मुडपून दोन्ही हाताच्या आवळलेल्या मुठी हनुवटीशी एकत्र ठेवत ए...

-
दोन सुशब्द हे लिहणारा मी नाहीच. यातला मी मला कुठेच सापडत नाही. तो नक्की कोण असावा तेही मला माहित नाही. तो येतो पावसाच्या गारांस...
-
दोन सुशब्द झाल्यावर आणखी 'प्रस्तावना' कशाला? म्हणून ही प्रस्तावना नसून 'फोडणी' आहे. फोडणी दिल्याशिवाय भाजी साधत नाही. ही फो...
-
रिंगण आम्ही बांधाच्या उजव्या बाजूने निघालो. आमावस्येच्या रात्रीचं शिशीरातलं आभाळाचं गोड चांदणं आज तिखट दिसत होतं. बोचणारी थंडी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा